शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

जहाल नक्षलवादी अजय हिचामी यास अटक

Monday, 11th October 2021 01:48:00 AM

गडचिरोली,ता.११: खून, चकमक व अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला जहाल नक्षलवादी अजय हिचामी यास पोलिसांनी गट्टा-जांभिया परिसरातून आज अटक केली.

३० वर्षीय अजय हिचामी हा एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील रहिवासी आहे. २०१९ मध्ये तो गट्टा दलममध्ये सहभागी झाला. नक्षल्यांच्या अॅक्शन टीमचाही तो सदस्य होता. यंदा गट्टा व बुर्गी पोलिस मदत केंद्रांवर नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता. १८ सप्टेंबर रोजी सुरजागड येथील सोमाजी सडमेक याच्या हत्येत तो सहभागी होता. त्याच्यावर खुनाचे ३, चकमकीचे ५, व दरोड्याचा १ असे ९ गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
054PL
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना