गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

‘सर्च’चे कार्य प्रेरणादायी:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Monday, 11th October 2021 08:23:30 AM

गडचिरोली,ता.११:सर्च संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे.डॉ.बंग दाम्पत्य करीत असलेले दारूबंदीचे काम कठीण असून, तीएक साधना आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

आज संध्याकाळी राज्यपाल कोश्यारीयांनी चातगाव येथील सर्च संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील दवाखाना, वृक्षलागवड, तसेच व्यसनमुक्तीच्या कामाची माहिती जाणून घेतली.डॉ. बंग दाम्पत्याचाआदर्श इतरांनी घेतला पाहिजे, अशीभावना आपल्‍या मनोगतात राज्यपालांनी व्‍यक्‍त केली.नुकत्याच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रूग्‍णांसोबत राज्‍यपाल कोश्यारी यांनी संवाद साधला, सर्चच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ‘घरोघरी नवजात बाळाची काळजी’, ‘तारुण्यभान’ (जीवन शिक्षण) कार्यक्रम, ‘निर्माण’, आदिवासी आरोग्य, मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती, मुक्तिपथ(दारू व तंबाखू नियंत्रण), कोविडनियंत्रण, पाठ-कंबरदुखी व सांध्यांचे रोग, आणि सांख्यिकी इत्यादी विविध विभागाच्या कामाची माहिती दिली. डॉ.अभय बंग यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारुबंदी करणे आवश्यक असून, गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदीची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांना सांगितले. यावेळी राज्यपालांचे सचिव श्री.संतोषकुमार, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद,पोलिस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या १२ ऑक्टोबरला सकाळी सीआरपीएफतर्फे आयोजित गडचिरोली ते गुजरात या सायकल रॅलीचा शुभारंभ करतील. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4O5KT
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना