गुरुवार, 2 डिसेंबर 2021
लक्षवेधी :
  गोंडवाना विद्यापीठात ‘इग्नू’चे अभ्यास केंद्र सुरु करण्याचा निर्णय             शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आ.डॉ.देवराव होळी यांच्या नेतृत्वात भाजपचा चामोर्शी तहसील कार्यालयावर मोर्चा             भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीमती आशा प्रशांत नाकाडे यांची नियुक्ती             नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मरकनार-मुरुमभुशी रस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टर जाळले             ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू करणार : इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती             कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस ५० हजारांची मदत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय: आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती           

गरिबांचा प्रवास महागला:एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ,

Monday, 25th October 2021 07:45:46 AM

गडचिरोली,ता.२५: एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांसाठी १७.१७ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ आँक्टोबर २०२१ च्या मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.

भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. आज मुंबई येथे आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किलोमीटरनंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असणार आहे. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या गोरगरीब नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4RRHA
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना