/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१२: अकोला येथे स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ.मंगेश वड्डे यांनी नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठातून ‘पोल्ट्री सायन्स’ या विषयात पीएचडी मिळवली आहे.
विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. डॉ.मंगेश वड्डे हे धानोरा तालुक्यातील चिंगली(मोहली) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सोडे येथील आश्रमशाळा व गडचिरोली येथील वसंत विद्यालयात झाले.
‘इफेक्ट ऑफ इसेंशियल ऑईल अलोन ऑर इनकॉम्बिनेशन ऑन द परफॉर्मन्स ऑफ ब्रायलर्स’ हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. या प्रबंधाकfjता डॉ. सतीश मनवर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. डॉ. वड्डे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून रिसर्च आर्टिकल्स प्रकाशित केले आहेत. डॉ. वड्डे यांना शोधनिबंधावर राष्ट्रीय काँफेरन्समध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील स्व. रैसूजी वड्डे, आई जनाबाई वड्डे , पत्नी ईशा, मुलगा मेधानश व गडचिरोली येथील एकलव्य मित्र मंडळाच्या सदस्यांना दिले आहे.