बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

इंदिरा गांधींच्या नेतृत्वामुळेच भारत जगात बलाढ्य व प्रगतशिल देश बनला:डॉ.प्रमोद साळवे

Saturday, 20th November 2021 12:36:09 AM

गडचिरोली,ता.२०: इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या कणखर नेतृत्वामुळेच भारत जगात बलाढ्य व प्रगतशिल देश बनला, असे प्रतिपादन डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष व प्रदेश काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ.प्रमोद साळवे यांनी केले.

चातगाव येथील डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी दुधमाळा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल मेश्राम, कॉलेजच्या प्रशिक्षक श्रीमती नवमी बडगे, मयुरी विरखरे उपस्थित होते. डॉ.साळवे पुढे म्हणाले, इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या काळात कृषी, विज्ञान, अवकाश संशोधन, बँकांचे राष्ट्रीयीकरण इत्यादी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. एकूणच भारताच्या प्रगतीत त्यांचे योगदान मोठे असून, भारताची मान जगात उंचावली गेली. खंबीर व परिपक्व नेतृत्वामुळेच पाकिस्तानचे विभाजन होऊन् स्वतंत्र बांग्लादेशाची निर्मिती झाली. त्यांच्या करारी नेतृत्वामुळेच अमेरिकेचे सातवे आरमार भारतापर्यंत पोहचू शकले नाही. परंतु अलीकडच्या काळात इंदिराजींच्या काळातील देदिप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे, हे दुर्दैव आहे, असेही डॉ.साळवे म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन निकिता सडमेक, प्रास्ताविक स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष साक्षी कुमरे, तर आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष अबोली त्रिसुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शीतल पदा, वनश्री दाजगाये, ट्विंकल सयाम, श्रद्धा सलामे, अमिशा पेटकर, साक्षी मडावी, पायल मडावी, पूजा भांडेकर, शीतल हुमणे, रविना फुलकंवर, ईश्वरी कावळे, कोमल टेकाम, अपर्णा तुलावी, मालती सिकदर, संध्या लोहबळे, पूजा रामटेके, पूनम वट्टी, प्राची नंदेश्वर, मयुरी गडपायले, शुभांगी गेडाम, प्राजिली येरमे, अंजली चंदागडे, पायल सिडाम, विभा निकुरे, सेजल सोनके, पल्लवी बोरकर, प्रणाली तुलावी, रेश्मा मट्टामी, प्रतीक्षा कुलयेटी, वैष्णवी साखरे, अजय चांग आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RTH2E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना