गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

खा. अशोक नेते यांच्या हस्ते अगरबत्ती प्रकल्पातील कामगारांना ई-श्रम कार्डचे वाटप

Monday, 22nd November 2021 06:36:31 AM

गडचिरोली,ता.२२: चामोर्शी येथील अगरबत्ती प्रकल्पात कार्यरत कामगारांना आज खा.अशोक नेते यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.

देशात श्रम करणाऱ्या कामगारांना विविध लाभ देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई-श्रम कार्ड महत्वाचे आहे, असे खा.अशोक नेते यावेळी म्हणाले.

चामोर्शी येथील १०० महिलांना अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे. याबाबत खा.नेते यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, भाजयुमोचे प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश बारसागडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, प्रकल्प संचालक आशिष पिपरे उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
B5RV8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना