गुरुवार, 2 डिसेंबर 2021
लक्षवेधी :
  गोंडवाना विद्यापीठात ‘इग्नू’चे अभ्यास केंद्र सुरु करण्याचा निर्णय             शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आ.डॉ.देवराव होळी यांच्या नेतृत्वात भाजपचा चामोर्शी तहसील कार्यालयावर मोर्चा             भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीमती आशा प्रशांत नाकाडे यांची नियुक्ती             नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मरकनार-मुरुमभुशी रस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टर जाळले             ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू करणार : इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती             कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस ५० हजारांची मदत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय: आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती           

७३.५५ टक्के नागरिकांनी पहिला, ३४.२५ टक्के नागरिकांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोज

Wednesday, 24th November 2021 06:48:02 AM

गडचिरोली,ता.२४: जिल्ह्यात आतापर्यंत ७३.५५ टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला, तर ३४.२५ टक्के नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे.

जिल्ह्यातील ११ लाख ८८ हजार नागरिकांपैकी ८ लाख ३५ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातील ६ लाख १४ हजार १४१ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोज घेतला आहे. २ लाख ८६ हजार २२ नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. अशाप्रकारे ९ लाख १६३ नागरिकांनी हे डोज घेतले आहे. आता २ लाख २० हजार ८६६ नागरिकांना पहिला, तर ५ लाख ४८ हजार ९८५ नागरिकांना दुसरा डोज द्यावयाचे बाकी आहे. पहिला डोज घेण्यात चामोर्शी तालुका आघाडीवर असून, गडचिरोली तालुक्याचा दुसरा क्रमांक आहे. नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.

लसीकरणात माघारलेले तालुके

अजूनही पहिला डोज देण्यात माघारलेल्या तालुक्यांमध्ये अहेरी तालुका पहिल्या, तर एटापल्ली तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहेरी तालुक्यात ४४ हजार १९८ नागरिकांना, तर एटापल्ली तालुक्यात ३६ हजार ७७२ नागरिकांना पहिला डोज देणे शिल्लक आहे. चामोर्शी तालुक्यात ३२ हजार ७३९ नागरिकांना पहिला डोज देणे बाकी असून, हा तालुका लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकांवर आहे. या तीन तालुक्यांत लसीकरणाची गती वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6AOFV
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना