बुधवार, 26 जानेवारी 2022
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर             लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची ३१ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर झेप-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक             गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा, नवमतदारांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप             २५ जानेवारी कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात ४३ जण बाधित, २०१ रुग्ण कोरोनामुक्त           

नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टर जाळले

Saturday, 27th November 2021 06:08:52 AM

गडचिरोली,ता.२७: सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टर्सची जाळपोळ केल्याची घटना आज सकाळी भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत मुरुमभुशी गावाजवळ उघडकीस आली. यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.

भामरागड तालुक्यात मरकनार ते मुरुमभुशी या रस्त्याचे काम सुरु होते. काल रात्री नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावर असलेले दोन ट्रॅक्टर जाळले. १३ नोव्हेंबरला मर्दिनटोला येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २७ नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. या घटनेचा निषेध म्हणून नक्षल्यांनी आज सहा राज्यामध्ये बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, नक्षल्यांनी मुरुमभुशी गावाजवळ दोन ट्रॅक्टरची जाळपोळ केल्याने त्या परिसरात नागरिक भयभित झाले आहेत. मात्र, आजच्या बंददरम्यान मुरुमभुशी गावची घटना वगळता कुठेही अनूचित घटना घडली नाही. दुर्गम भागातील प्रवासी वाहतूक सुरळीत सुरु होती. बदच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5A84F
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना