बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठात ‘इग्नू’चे अभ्यास केंद्र सुरु करण्याचा निर्णय

Tuesday, 30th November 2021 06:04:06 AM

गडचिरोली,ता.३०: येथील गोंडवाना विद्यापीठात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे (IGNOU) नियमित अभ्यास केंद्र सुरु होणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दिली.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाला महत्वाचे स्थान आहे. परंतु अनेक नागरिक विविध कारणांमुळे शैक्षणिक संधीपासून वंचित राहतात. असे वंचित नागरिक आणि नोकरी करुन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी इग्नूच्या अभ्यास केंद्राचा फायदा होईल, असे कुलगुरु डॉ.वरखेडी यांनी सांगितले. या बैठकीला प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ क्षेत्रिय निदेशक डॉ. पी. शिवस्वरूप, सहायक क्षेत्रिय निदेशक शशीकुमार ब्रॉमट, विभाग अधिकारी चंद्रशेखर राजगुरु, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4VQA4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना