गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची भरपाई द्या:खा.अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

Tuesday, 7th December 2021 05:48:47 AM

 

गडचिरोली,ता.७: नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे हजारो एकर शेतीतील पिकाचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज लोकसभेत केली.

शून्य प्रहरात प्रश्न उपस्थित करताना खा.अशोक नेते म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील धान, सोयाबीन व कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले. कापणीसाठी तयार झालेले धान सडले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना एकरी १० हजार व हेक्टरी २५ हजार रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी खा.नेते यांनी केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Z03KV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना