/* */
शनिवार, 30 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

डॉ. प्रशांत बोकारे गोंडवाना विद्यापीठाचे नवे कुलगुरू

Wednesday, 8th December 2021 08:18:42 AM

गडचिरोली,ता.८: छत्तीसगडमधील रायगड येथील ओ.पी.जिंदाल विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अधिष्ठाता असलेले डॉ.प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी असणार आहे.

७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. आता डॉ.बोकारे यांची नियुक्ती झाल्याने गोंडवाना विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरु मिळणार आहे.

२३ नोव्हेंबर १९६३ रोजी जन्मलेले डॉ. प्रशांत बोकारे हे वर्धा येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील व्हीआरसीई येथून एम. ई. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.पुढे आयआयटी गुवाहाटी येथून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यांना अध्यापन व संशोधनाचा व्यापक अनुभव आहे. यापूर्वी डॉ. बोकारे यांनी सेवाग्राम(वर्धा) येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच रुंगटा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे प्राध्यापक व प्राचार्य पदावर काम केले आहे. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट इंदोर येथील संचालक प्रा. हिमांशू रॉय व शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. प्रशांत बोकारे यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
543EL
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना