/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.८: रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू आणि गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांची नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतातील संस्कृत विद्यापीठांपैकी सर्वात मोठे १२ कॅम्पस, मुक्त अध्ययन केंद्र आणि संचालित संस्थांचा विस्तृत व्याप असलेले हे विद्यापीठ प्रत्यक्ष भारत सरकारच्या आधिपत्याखाली कार्य करते. यापूर्वी वर्षभर प्रा.वरखेडी यांनी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरूपद यशस्वीरित्या सांभाळले आहे.