मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात आढळले ओमायक्रॉनचे दोन रुग्ण

Monday, 10th January 2022 08:07:15 AM

गडचिरोली,ता.१०: जिल्ह्यात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय आज ३१३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यात २२ जण बाधित आढळून आले, तर ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

गडचिरोली येथे ७ आणि २८ डिसेंबरला दोन नमुने घेण्यात आले होते. ३० डिसेंबर रोजी हे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास नुकताच प्राप्त झाला असून, दोन नमुने ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यातील पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे, तर दुसरा रुग्ण हा धानोरा येथील केंद्रीय राखीव दलाचा जवान असून, तो उपचार घेत आहे. त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. आजच्या बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८, देसाईगंज ३ आणि चामोर्शी तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार २० जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हजार १०७ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या १६६ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के, तर मृत्यूदर २.४१ टक्के एवढा आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Z4E39
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना