बुधवार, 26 जानेवारी 2022
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर             लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची ३१ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर झेप-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक             गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा, नवमतदारांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप             २५ जानेवारी कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात ४३ जण बाधित, २०१ रुग्ण कोरोनामुक्त           

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस

Tuesday, 11th January 2022 05:58:58 AM

गडचिरोली,ता.११: जिल्ह्यात आज सकाळी जोरदार पाऊस पडला. गोविंदपूर नाल्याच्या रपट्यावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्ग दुपारपर्यंत बंद होता, तर चामोर्शी-घोट मार्गावर काही ठिकाणी झाडे तुटून पडल्याने वाहतूक खोळंबली होती.

आज सकाळी गडचिरोलीसह अन्य भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. गोविंदपूरनजीकच्या नाल्यावर पुलाचे काम सुरु असून, दळणवळणासाठी कच्चा रपटा तयार करण्यात आला आहे. मात्र, आज सकाळपासून या रपट्यावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद होती. दुपारी साडेचार वाजतानंतर पाणी ओसरताच वाहतूक सुरु झाली. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात चामोर्शी येथे सर्वाधिक ६६ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल आरमोरी तालुक्यात ५४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. .


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K91X9
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना