बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यात १०८ जण बाधित, ३९ रुग्ण कोरोनामुक्त

Thursday, 13th January 2022 07:04:53 AM

गडचिरोली,ता.१३: जिल्ह्यात आज १२४७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यात १०८ जण बाधित आढळून आले, तर ३९ रुग्ण आजारातून बरे झाले. आजच्या १०८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६४, अहेरी १८, आरमोरी २, भामराग ८, चामोर्शी ४, धानोरा ४, देसाईगंज ४ आणि एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा व कोरची तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ३१३ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हजार २१७ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ३४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५० टक्के, तर मृत्यूदर २.३९ टक्के एवढा आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
266B0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना