बुधवार, 26 जानेवारी 2022
लक्षवेधी :
  दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मूल्ये आणि विकासाला अंगीकारल्याने गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती बदलत आहे: प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन             गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर             लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची ३१ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर झेप-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक             गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा, नवमतदारांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप             २५ जानेवारी कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात ४३ जण बाधित, २०१ रुग्ण कोरोनामुक्त           

जहाल नक्षली करण उर्फ दुलसा नरोटे यास अटक

Friday, 14th January 2022 06:16:57 AM

गडचिरोली,ता.१४: पोलिसांनी आज जहाल नक्षली करण उर्फ दुलसा नरोटे यास एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतून अटक केली. गट्टा पोलिस मदत केंद्रातील पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या १०१ बटालियनचे जवान आज संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना करण उर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात आली.

करण हा नक्षल्यांच्या प्लाटून क्रमांक १४ चा सशस्त्र दलम सदस्य होता. शिवाय तो गट्टा दलम आणि नक्षल्यांच्या ऍ़क्शन टीमचाही सदस्य होता. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. २००८ मध्ये दोबूर, कोरेपल्ली, २०१० मधील मिरकल इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकी, राजू धुर्वा आणि चुक्कू यांचा खून, तसेच १४ ऑगस्ट २०२० रोजी कोठी पोलिस मदत केंद्रातील पोलिस दुष्यंत नंदेश्वर याची हत्या, तसेच अन्य हिंसक कारवायांमध्ये करण उर्फ दुलसा नरोटे याचा सहभाग होता. त्याच्यावर १६ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L0U54
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना