बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भामरागड तालुक्यात नक्षल्यांनी १९ वाहने जाळली

Saturday, 22nd January 2022 12:26:25 AM

गडचिरोली,ता.२१: सशस्त्र नक्षल्यांनी आज दुपारी भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रांतर्गत इरपणार गावालगत रस्त्याच्या कामावरील १९ वाहने जाळली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

धोडराज-इरपणार-नेलगुंडा रस्त्याचे काम सुरु आहे. आज दुपारी २ वाजताच्या सुमारास ६० ते ७० नक्षली कामाच्या स्थळी गेले. त्यांनी वाहनचालक आणि मजुरांना मारहाण करुन हाकलून लावले. त्यानंतर नक्षल्यांनी १६ ट्रॅक्टर, २ जेसीबी आणि १ ग्रेडर अशा १९ वाहनांची जाळपोळ केली. नक्षल्यांनी घटनास्थळी कापडी फलक लावून सुरजागड लोह प्रकल्प तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L0CU8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना