/* */
रविवार, 22 मे 2022
लक्षवेधी :
  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश             कमलापूचे हत्ती जामनगरला नेण्याच्या विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, तर भाजपने केला चक्काजाम             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

Tuesday, 25th January 2022 07:09:05 AM

गडचिरोली,ता.२५: राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संविधानाने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार दिला आहे, त्याचा वापर करुन लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. याप्रसंगी १८ हजार ६०२ नवमतदारांची नोंदणी झाली असून, त्यातील ९९९६ मतदार हे १८ ते १९ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली. या मतदारांपैकी निवडक चार मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
22L7X
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना