/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२५: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, आज गृहमंत्रालयाने देशभरातील शूर पोलिसांना पदक जाहीर केले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक मिळाले आहे.
गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील सहायक फौजदार गोपाल उसेंडी, शिपाई महेंद्र कुलेटी, शिपाई संजय गणपती बकमवार, पोलिस उपनिरीक्षक भारत चिंतामण नागरे, पोलिस शिपाई दिवाकर केसरी नरोटे, हवालदार निलेश्वर देवाजी पदा, हवालदार संतोष विजय पोटावी यांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल केंद्रीय राखीव दलाच्या १९२ बटालियनचे सहायक कमांडंट अतुल प्रतापसिंह आणि जिल्हा पोलिस दलातील सहायक फौजदार बस्तर लक्ष्मण मडावी यांना पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.