/* */
रविवार, 22 मे 2022
लक्षवेधी :
  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश             कमलापूचे हत्ती जामनगरला नेण्याच्या विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, तर भाजपने केला चक्काजाम             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

लाकूड तस्करांकडून ८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर वनगुन्हे दाखल

Tuesday, 1st February 2022 08:51:01 AM

गडचिरोली,ता.१: आलापल्ली वनपरिक्षेत्रातील झिमेला(२) येथील राखीव जंगलातून अवैधरित्या वृक्षतोड करुन वाहतूक करणाऱ्या तस्करांकडून वनाधिकाऱ्यांनी ८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १२ जणांवर वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे बाराही जण अहेरी तालुक्यातील रायगट्टा येथील रहिवासी आहेत.

काल ३१ जानेवारीला वनाधिकाऱ्यांचे पथक झिमेला जंगलात गस्तीवर असताना कक्ष क्रमांक ५४ मधील राखीव जंगलातून मूल्यवान वृक्षांची कत्तल करुन वाहतूक करताना काही इसम आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी सर्वांना पकडून २.०१५ घनमीटर लाकूड, ६ बैलगाड्या व १२ बैल असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नारायण चिरकेला, राजन्ना जाकेवार, सुरेश आलमवार, समय्या निलमवार, संतोष मोहुर्ले, नागेश चिंतावार, श्रीकांत निलमवार, बापू आलाम, संतोष गादे, मोहन कोलावार, तिरुपती चिंतावार व नरेश निलमवार सर्व रा.रायगट्टा, पो. राजाराम, ता.अहेरी यांच्यावर भारतीय वनअधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गडचिरोली वनवृत्ताचे प्रादेशिक वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, उपविभागीय वनाधिकारी नीतेश देवगडे यांच्या मार्गदर्शनात आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर, क्षेत्रसहायक मोहन भोयर,अनिल झाडे,ऋषी तावाडे, प्रकाश राजुरकर, बाळू मडावी, चंदू सडमेक, तुषार मडावी, संतोष चव्हाण, सचिन जांभुळे, अविनाश कोडापे, दामाधर चिव्हाणे, दशरथ राठोड, बंटी अलोणे, विक्की कोडापे, सचिन डांगे, शंकर ओडपल्लीवार, नानाजी मडावी, संदीप भोयर, व्यंकटी सडमेक यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
00L68
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना