/* */
शुक्रवार, 27 जानेवारी 2023
लक्षवेधी :
  झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत डॉ.परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर             गडचिरोली पोलिस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर           

मुलाने केला वडिलांचा खून

Thursday, 3rd February 2022 06:50:12 AM

गडचिरोली,ता.३: रागाच्या भरात मुलाने कुऱ्हाडीने आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास गडचिरोलीनजीकच्या विसापूर टोली या गावात घडली. दामोधर तांगडे(५५) असे मृत इसमाचे, तर तेजस दामोधर तांगडे(२३), असे आरोपीचे नाव आहे.

दामोधर तांगडे यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा पोलिस विभागात कार्यरत आहे, तर लहान मुलगा तेजस हा बेरोजगार आहे. दामोधर तांगडे यांचे अधूनमधून मुलगा आणि पत्नीशी भांडण व्हायचे. आज भांडण झाल्यानंतर राग अनावर झाल्याने वडील दामोधर तागडे यांचा खून करुन तेजस पसार झाला. घटनेची माहिती कळताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गावंडे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या पथकाने मोबाईलच्या लोकेशनवरुन आरोपी तेजस तांगडे यास गडचिरोली येथील बसस्थानक परिसरातून अवघ्या दोन तासांतच अटक केली. आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TY4H4
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना