/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.३०: घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात निदर्शने केली. शिवाय महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, रायुकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, माजी नगरसेविका संध्या उईके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष नीता बोबाटे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, सामाजिक न्याय महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष प्रमिला रामटेके, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव रेखा कोराम, आरती कोल्हे, दादाजी चुधरी, कपिल बागडे, विवेक बाबनवाडे, अमोल कुळमेथे, अमर खंडारे, सुनील कत्रोज, नितीन पिपरे, राजू डांगेवार, सुनील चिमूरकर, हस्ते, बागडे, रेखा सहारे, लता शेंद्रे, सविता चव्हाण, जैनान शेखे, सरिता कोकोडे, मीना डहारे, छाया निमरड, अर्चना गोरघाटे, सरोज रामटेके यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.