गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने, धरणे आंदोलन

Friday, 1st April 2022 07:30:35 AM

गडचिरोली,ता.१: पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात आज कॉग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करुन धरणे आंदोलन केले.

केंद्रातील मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. देशाचा जीडीपी घसरला असून, बेरोजगारीमुळे युवकांत नैराश्य आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व अन्य जीवनश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने गोरगरीब नागरिकांचे जीणे मुश्किल झाले आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका घ्यावी, असे आवाहन महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह अन्य वक्यांरानी केले.

या आंदोलनात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, पक्षाचे प्रदेश महासचिव तथा निरीक्षक डॉ.एन.डी.किरसान, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रुपाली पंदिलवार, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सरचिटणीस डॉ.चंदा कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, अतुल मल्लेलवार, नंदू वाईलकर, माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट, संजय पंदिलवार, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी विभाग अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शामराव चापले, जयंत हरडे, शोएब मस्तान, नंदू नरोटे, महेश जेलेवार, मोहन पुराम, प्रभाकर तुलावी, प्रभाकर कुबडे, श्रीकांत काथोडे, वसंत राऊत, सुदर्शन उंदिरवाडे, रामभाऊ नन्नावरे,संदीप भैसारे, मनोज आखाडे, मोरेश्वर सूर्यवंशी, देविदास देशमुख, पंढरी चौके, गणेश धरने, मनोज धारणे, प्रशांत कोराम, परशुराम गेडाम, मुकुंद बावणे, दिलीप चुदरी, नीलकंठ बावणे, ढिवरू दुर्गे, अनुरथ, श्रीरंग कोराम,भूपेश कोलते,मनोहर नवघडे, अरविंद फटाले, दिलीप जांभूळकर, देवा देशमुख,मोना पोटे, ढिवरू मेश्राम, दिवाकर निसार,कृष्णा झंजाळ, गिरीधर तितराम,सूरज मडावी, यामिनी कोसरे, लता मुरकुटे, पुष्पा कुमरे, गौरव येनप्रेड्डीवार, विपूल येलेट्टीवार, कुणाल ताजने यांच्यासह अन्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
88IN1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना