/* */
रविवार, 22 मे 2022
लक्षवेधी :
  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश             कमलापूचे हत्ती जामनगरला नेण्याच्या विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, तर भाजपने केला चक्काजाम             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

मागास गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी विशेष सवलती देण्याची गरज: केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला

Friday, 22nd April 2022 01:02:00 AM

गडचिरोली,ता.२१: आकांक्षित गडचिरोली जिल्ह्याचा औद्योगिक विकास जलद गतीने व्हावा, यासाठी या जिल्ह्याला उद्योगविषयक विशेष सवलती देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले. गडचिरोली जिल्हा व्यापारी असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी,आ.कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महासचिव गोविंद सारडा, अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम यांच्यासह भाजप आणि व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्हा आकांक्षित असून, केंद्र शासनाचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. मात्र, औद्योगिक विकास जलद गतीने व्हावा, यासाठी या जिल्ह्याला विशेष सवलती वा पॅकेज देण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी हितगूज करुन त्यांचे प्रश्न समजून घेतले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
53FGZ
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना