शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Friday, 13th May 2022 01:42:41 AM

गडचिरोली,ता.१३: धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची केल्याची घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावानजीक घडली. नलू बाबूराव जांगडे(३५) रा.अरसोडा असे मृत महिलेचे नाव आहे.

नलू जांगडे हिला पती व तीन मुली आहेत. पती आजारी राहत असल्याने नलू आज सकाळी उन्हाळी धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेली होती. मात्र, बांधाआड दडून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती गतप्राण झाली. ही बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी वाघ त्याच परिसरात होता. आरडाओरड करुन नागरिकांनी वाघाला पिटाळून लावले. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

१० दिवसांतील दुसरी घटना

३ मे रोजी देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूरनजीकच्या जंगलात मैत्रिणीसोबत गेलेल्या युवकास वाघाने ठार केले होते. त्यानंतर शेजारच्या आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे आज वाघाने महिलेस ठार केले आहे. १० दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने दोन्ही तालुक्यांतील नागरिक भयभीत झाले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
J5ACK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना