गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ येथे पर्यावरण दिन साजरा

Sunday, 5th June 2022 05:55:01 AM

गडचिरोली,ता.५: आलापल्ली वनविभागाच्या वतीने आलापल्ली-हेमलकसा मार्गावरील पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ येथे आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर व आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंग टौलिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ येथील परिसर आणि नजीकच्या मिरकल गावातील तलावाची स्वच्छता करण्यात आली. शिवाय १६ किलोमीटरपर्यंत सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी सहायक वनसंरक्षक नीतेश देवगडे, मिरकल येथील प्रतिष्ठीत नागरीक करपा कुळमेथे, गाव पाटील डोबी गावडे, वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांनी मार्गदर्शन केले. श्री.देवगडे यांनी पर्यावरण चळवळीचा इतिहास सांगून, पर्यावरणाच्या रक्षणाकरिता प्रत्येक नागरिकाने काम करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. करपा कुळमेथे यांनी मिरकलचे ग्रामस्थ आणि वनविभागाचे नाते दृढ राहिल्यास ग्लोरी ऑफ आलापल्ली येथील पर्यटनस्थळाचा विकास होण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन झिमेला येथील क्षेत्रसहायक मोहन भोयर, तर आभार प्रदर्शन वनपाल पूनम बुद्धावार यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वनपाल ऋ्षिदेव तावाडे, रेखा किरमिरे, वनरक्षक देवानंद कचलामी, दामोदर चिव्हाणे, सचिन जांभुळे, संतोष चव्हाण बक्का कुळमेथे, महेंद्र येलीचपूरवार, राठोड, साहिल इझाडे, लक्ष्मी नान्हे, वंदना कोडापे, शेख, वनमजूर बंडू रामगिरवार, निखील गड्डमवार, मलेश वाहन चालक सचिन डांगरे यांच्यासह मिरकल येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4WVRR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना