गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दिव्यांगासाठी सामाजिक बांधिलकीतून काम करा: खा.सुप्रिया सुळे

Tuesday, 7th June 2022 06:09:50 AM

गडचिरोली,ता.७: दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी सामाजिक बांधिलकीतून काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी केले.

खा.सुप्रिया सुळे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप खा.सुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्ह्यातील तपासणी करण्यात आलेल्या २१४ दिव्यांग व्यक्तींपैकी १९१ बालकांना अत्याधुनिक डिजिटल कर्णयंत्र देण्यात आले. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S95C1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना