/* */
शनिवार, 2 जुलै 2022
लक्षवेधी :
  अ.भा.आंतरविद्यापीठ वूडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने पटकावले सुवर्ण आणि कांस्य पदक             नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील सहा वाहने जाळली: भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथील घटना             वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार: आरमोरी तालुक्यातील बोरीचक येथील घटना             कंत्राटदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना कुरखेडा नगर पंचायतीचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

गडचिरोली नगर परिषदेचे आरक्षण जाहीर

Monday, 13th June 2022 02:19:57 AM

गडचिरोली,ता.१३: आज येथील नगर परिषद कार्यालयात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण २७ सदस्यांमध्ये १४ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत.

नव्या रचनेत गडचिरोली नगर परिषदेत एकूण १३ प्रभाग आणि २७ सदस्य असणार आहेत. प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये प्रत्येकी दोन, तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये ३ सदस्य राहतील. आज काढण्यात आलेल्या सोडतीनुसार, प्रभाग क्रमांक १: अनुसूचित जाती(सर्वसाधारण), खुला प्रवर्ग(महिला), प्रभाग क्रमांक २: अनूसचित जमाती(सर्वसाधारण), खुला प्रवर्ग(महिला), प्रभाग क्रमांक ३: खुला प्रवर्ग(महिला), खुला प्रवर्ग(सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ४: अनुसूचित जमाती(महिला), खुला प्रवर्ग(सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ५: अनुसूचित जाती(महिला), खुला प्रवर्ग(सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ६: खुला प्रवर्ग(महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ७: अनुसूचित जाती (सर्वसाधारण), खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ८: खुला प्रवर्ग( महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ९: खुला प्रवर्ग(महिला), खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १०: अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), खुला प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक ११: अनुसूचित जमाती(महिला), खुला प्रवर्ग(सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १२: खुला प्रवर्ग(महिला), खुला प्रवर्ग(सर्वसाधारण), तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनुसूचित जाती (महिला), खुला प्रवर्ग(महिला), खुला प्रवर्ग(सर्वसाधारण) असे आरक्षण असणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U4V7N
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना