गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

Thursday, 16th June 2022 06:32:53 AM

गडचिरोली,ता.१६: सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमास वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथे घडली. वासुदेव मुरलीधर मेश्राम(४५) असे मृत इसमाचे नाव आहे.

वासुदेव मेश्राम यांचा मृतदेह आढळून आल्याने नागरिक भयभित झाले आहेत. दरम्यान, हल्ला करणारा वाघ ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून आलेला असून, त्याने त्या भागात अनेक नागरिकांना ठार केले आहे. या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची चमू लवकरच दाखल होणार असल्याची माहिती वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री.सालविठ्ठल यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Y4H0W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना