गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी बाळू टेंभुर्णे

Sunday, 19th June 2022 02:33:36 AM

गडचिरोली,ता.१९: वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी बाळू टेंभुर्णे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी टेंभुर्णे यांची नियुक्ती केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीकरिता विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी प्रदेश कार्यालयातून जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून योगेंद्र बांगरे, मंगलदास चापले, संघटक धर्मेंद्र गोवर्धन, जगन्नाथ बन्सोड, भिमराव शेंडे, उपाध्यक्षपदी जी.के.बारसिंगे, मिलिंद अंबादे, देवानंद दुर्गे, पुरुषोत्तम बांबोळे, सचिवपदी उत्तमचंद बारसागडे, आयटी सेल प्रमुखपदी संदीप सहारे, तर सदस्य म्हणून भोजराज रामटेके, नारायण मुंघाटे, संदीप गेडाम, माला मेशब, वैशाली वनकर यांची नियुक्ती करण्यात आली.

पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम टेंभुर्णे, पत्रू टेंभुर्णे, प्रफुल्ल मेश्राम, नामदेव उंदिरवाडे, किशोर भैसारे, तुफान उंदिरवाडे, एन.आ.रामटेके, योगेश टेंभुर्णे, उद्धव खोब्रागडे, मनोज घायवान, नामदेव मेश्राम, देवचंद मेश्राम, महिला नेत्या माला भजगवळी, सीमा दुर्गे, मंजुषा थेरकर, प्रज्ञा निमगडे, वैशाली सोनटक्के, रंजना तागडे, प्रज्ञा खोब्रागडे, पूजा गायधने, रोहित टेंभुर्णे, घोसू शहा, समीर रामटेके, रोहित चौधरी, स्वप्नील उंदिरवाडे आदींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EKTKN
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना