/* */
सोमवार, 8 ऑगस्ट 2022
लक्षवेधी :
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कोरचीत १७ पैकी १३ प्रभारी अधिकारी करणार ध्वजारोहण             महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची गडचिरोलीत रॅली             चामोर्शी पंचायत समितीतील आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात: कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी इसमाकडून स्वीकारली साडेतीन हजार रुपयांची लाच             सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी             निकृष्ट तांदूळ प्रकरण: अहवाल न दिल्याने राज्य शासनाने डीएसओला खडसावले             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

Wednesday, 29th June 2022 12:58:38 AM

गडचिरोली,ता.२९: शेतावर गेलेल्या एका इसमास वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील बोरीचक या गावानजीक घडली. सागर आबाजी वाघरे(४५) असे मृत इसमाचे नाव आहे.

सध्या खरीप हंगाम सुरु असल्याने सागर वाघरे हे आपल्या शेतावर गेले होते. परंतु झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक वाघरे यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. रविवारी(ता.२६) सकाळी पोर्ला येथे एका युवकास वाघाने ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच आज बोरीचक येथे दुसरी घटना घडली. शेतीचा हंगाम सुरु असताना वन्यजीव-मानव संघर्ष सातत्याने होत असल्याने शेतीची कामे कशी करायची, या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RD80K
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना