/* */
सोमवार, 8 ऑगस्ट 2022
लक्षवेधी :
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कोरचीत १७ पैकी १३ प्रभारी अधिकारी करणार ध्वजारोहण             महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची गडचिरोलीत रॅली             चामोर्शी पंचायत समितीतील आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात: कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी इसमाकडून स्वीकारली साडेतीन हजार रुपयांची लाच             सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी             निकृष्ट तांदूळ प्रकरण: अहवाल न दिल्याने राज्य शासनाने डीएसओला खडसावले             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

खा. अशोक नेतेंच्या वाढदिवशी मोबाईल हेल्थ युनिटचे लोकार्पण

Friday, 1st July 2022 07:23:39 AM

गडचिरोली,ता.१: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या वाढदिवशी आज चार मोबाईल हेल्थ युनिटचे लोकार्पण करण्यात आले. शिवाय ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वितरण करण्यात आले.

आज सकाळी जिल्हा मोबाईल हेल्थ युनिटचे उद्घाटन खा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर्स्, आरोग्य कर्मचाऱी, तपासणी आणि औषधोपचार साहित्याने सुसज्ज अशा चार वाहनांपैकी एक वाहन अहेरी, तर दुसरे कोरची येथे देण्यात येणार आहे. यामुळे गरजूंना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होऊन रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असा विश्वास खा.नेते यांनी व्यक्त केला.

शिवाय खा.नेते यांच्या हस्ते गडचिरोली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध आणि मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. शिवाय जंगल कामगार संस्था, स्नेहनगर इत्यादी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. राजीव गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरीत करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र ओल्लालवार, जिल्हा सरचिटणीस प्रमोद पिपरे, अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, अविनाश पाल, देवराव मुद्धमवार, किशोर वाकुडकर, जितू सोनटक्के, बंडू झाडे, देविदास नागरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EUP75
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना