/* */
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
लक्षवेधी :
  वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलातील घटना             रक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी             आरमोरीजवळच्या गाढवी नदीच्या पुलावर अपघात: गडचिरोलीचे आ.डॉ.देवराव होळी थोडक्यात बचावले             चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या: कोवानटोला-जपतलाई येथील घटना             एटापल्ली तालुक्यातील संतापजनक घटना: ५० वर्षीय आदिवासी महिलेवर ट्रकचालकाने केला बलात्कार, आरोपीस अटक             गडचिरोली: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार- शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन           

सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Tuesday, 2nd August 2022 07:30:54 AM

गडचिरोली,ता.२: जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यात पूर आला होता. या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आज केंद्रीय पथक सिरोंचा येथे आले होते.

या पथकात केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी विभागाचे संचालक ए.एल वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या पथकातील अधिकाऱ्यांनी सिरोचा,आरडा, मुगापूर, मद्दीकुंठा आणि मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. तसेच शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवून आवश्यक ती प्रकिया तातडीने करण्याची ग्वाही पथकातील अधिकाऱ्यांनी आपद्ग्रस्तांना दिली.

त्यानंतर केंद्रीय पथकाने गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संबंधित सर्व विभागांच्या विभागप्रमुखांकडून पूरबाधित नुकसानीची माहिती जाणून घेतली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L1ZG6
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना