/* */
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
लक्षवेधी :
  वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलातील घटना             रक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी             आरमोरीजवळच्या गाढवी नदीच्या पुलावर अपघात: गडचिरोलीचे आ.डॉ.देवराव होळी थोडक्यात बचावले             चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या: कोवानटोला-जपतलाई येथील घटना             एटापल्ली तालुक्यातील संतापजनक घटना: ५० वर्षीय आदिवासी महिलेवर ट्रकचालकाने केला बलात्कार, आरोपीस अटक             गडचिरोली: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार- शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन           

चामोर्शी पंचायत समितीचा आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 2nd August 2022 07:50:28 AM

गडचिरोली,ता.२: पत्नीच्या नावाने कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी तिच्या पतीकडून साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज चामोर्शी पंचायत समितीच्या आरोग्य सेवकास रंगेहाथ पकडून अटक केली. रामचंद्र मार्कंडी पाटेवार(४७), असे आरोपीचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याला त्याच्या पत्नीच्या नावाने कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून घ्यायचे होते. परंतु त्यासाठी पंचायत समितीचा आरोग्य सेवक रामचंद्र पाटेवार याने ४ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ३ हजार ५०० रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने संबंधित इसमाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून रामचंद्र पाटेवार यास पंचांसमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, शिपाई किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजी, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, विद्या म्हशाखेत्री, तुळशीराम नवघरे आदींनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0W01Y
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना