/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१५: जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या तीन जणांना शौर्य चक्र, ४२ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आले आहे.
गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे(आयपीएस), शिपाई रवींद्र नैताम व टिकाराम काटेंगे हे शौय चक्राचे मानकरी ठरले आहेत. तसेच गडचिरोलीचे तत्कालिन अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनिष कल्वानिया, विद्यमान अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, पोलिस निरीक्षक संदीप भांड, संदीप मंडलिक, सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजने, मोतीराम मडावी, योगीराज जाधव, पोलिस उपनिरीक्षक राजरत्न खैरनार, दयानंद महाडेश्वर, हर्षल जाधव, शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमाने(मरणोत्तर), शहीद हवालदार जगदेव मडावी(मरणोत्तर), सेवकराम मडावी, शिपाई राजू कांदो, दामोधर चिंतुरी, राजकुमार भलावी, सागर मुल्लेवार, शंकर मडावी, रमेश आसम, जीवन उसेंडी, राजेंद्र मडावी, मनोज गज्जमवार, सुभाष वाढई, दसरु कुरसामी, अविनाश कुमरे, गोंगलू तिम्मा, महेश सयाम, साईकृपा मिरकुटे, रत्नय्या गोरगुंडा, विलास पदा, मनोज इस्कापे, अशोक मज्जी, देवेंद्र पाकमोडे, रोहित गोंगले, दीपक विडपी, सूरज गंजीवार, शहीद पोलिस शिपाई किशोर आत्राम(मरणोत्तर), योगेश्वर सडमेक, अंकुश खंडाळे, गजानन आत्राम यांना पोलिस शौर्य पदक प्राप्त झाले आहे. सहायक फौजदार प्रवीण बेझलवार व प्रमोद ढोरे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.