शनिवार, 30 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: दोन दिवसांत दुसरा बळी

Friday, 9th September 2022 05:19:16 AM

गडचिरोली, ता. ९: गडचिरोलीतालुक्यातील कळमटोला येथीलजंगलात गुरे चराईकरिता गेलेल्या इसमास वाघाने ठार केले. ही घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास अमिर्झा-गडचिरोली मार्गापासून दीड किलोमीटर आत कक्ष क्रमांक ४१५ या जंगलात घडली. कृष्णा महागू ढोणे(६०)रा. कळमटोला, असे मृत इसमाचे नाव आहे.

घटनेची माहिती प्राप्त होताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. कालच देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथे एका इसमास वाघाने ठार केले होते.त्यानंतर आज गडचिरोली तालुक्यात वाघाने एकाचा बळी घेतला. सातत्याने वाघाचे हल्ले होत असल्याने शेतकरी प्रचंड भयभीत झाले आहेत.

जेथे वाघाचे अस्तित्व आहे; त्या जंगलात एकट्याने जाऊ नये, असे वनविभाग वारंवार सांगत असतानाही अनेक जण सूचनांकडे डोळेझाक करीत असल्याने वाघाच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V67DH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना