/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दगाबाजी करुन कोणी बाहेर पडले असले तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. खरा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांनी पेटून उठणार असून, आगामी जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी केले.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात कात्रटवार कॉम्प्लेक्समधील कमल-केशव सभागृहात आयोजित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. किशोर पोतदार पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी, तसेच शिवसेना बळकट व्हावी, या हेतूने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री बनविले होते. परंतु अडीच वर्षाच्या काळात शिंदे यांनी शिवसेनेच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. शिवसैनिकांच्या हाताला काम मिळाले नाही. उलट उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम केले. त्यामुळे बाळासाहेबांना मानणारा खरा शिवसैनिक कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही, असे सांगून पोतदार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार असून, त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार म्हणाले, अन्यायाविरुद्ध लढून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेना नेहमीच आघाडीवर राहिली आहे. जे गद्दारी करुन बाहेर पडले;त्यांच्यासोबत खरा शिवसैनिक गेला नाही. तो उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत खरी शिवसेना आपली ताकद दाखवले, असे कात्रटवार म्हणाले.
शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका छाया कुंभारे म्हणाल्या की, संघर्षातून शिवसेनेचा जन्म झाला आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी शिवसेना संपणार नाही आणि ती संपविण्याची ताकदही कोणातही नाही. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन कुंभारे यांनी केले.
या मेळाव्याला जिल्हा सहसंपर्कप्रमुख विलास कोडापे, जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, शहरप्रमुख रामकिरीत यादव, माजी नगराध्यक्ष डॉ.अश्विनी यादव, विधानसभा संघटक नंदू कुमरे, चामोर्शी तालुकाप्रमुख अमित यासलवार, गजानन नैताम, शेखर उईके, गडचिरोली उपतालुकाप्रमुख यादव लोहंबरे, संदीप अलबनकर, संदीप भुरसे, स्वप्नील खांडरके, राहुल सोरते, निकेश लोहंबरे, अरुण बारापात्रे, राजू जवादे, दिलीप वलादे, निकेश मडावी, सचिन सेलोटे, मधुकर बावणे, गणेश बाबनवाडे, सूरज उईके, दयाराम चापले, रमेश चनेकर, मुखरु चांग, तुळशीराम मेश्राम, नीळकंठ दुमाने, निखील दिवटे, सचिन जुवारे, पवन हर्षे, प्रशांत ठाकरे, दिलीप लाडे, नंदू भैसारे, निरंजन लोहंबरे, जगन चापले, रवींद्र मिरास त्र्यंबक फुलझेले, राजू निकुरे, संजय गेडाम, उमेश जांभुळकर, किसन ढवळे, टेकाम भैसारे, रवींद्र धनफोडे, संजय करते, राजेंद्र झरकर, अमित बानबले, नानाजी हतबले, गुरुदेव सूर्यवंशी, महेश मडावी, नरेंद्र बुरांडे, चंद्रभान चांदेकर, अजय कांबळे, चेतन हजारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.