/* */
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022
लक्षवेधी :
  ३ कोटींच्या धान खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुरुमगाव येथील खरेदी केंद्रप्रमुखास अटक:             मेडीगड्डा धरणग्रस्तांनी आ.जयंत पाटलांना सांगितली व्यथा             शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पहिल्या दिवशी पाच महत्वाचे ठराव पारीत: आ.जयंत पाटील, आ.श्यामसुंदर शिंदे यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी उपस्थित             राज्यात सरकार आहे की नाही अशी स्थिती: शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांची गडचिरोलीत टीका           

आदिवासी महिलेवर ट्रक चालकाचा बलात्कार, आरोपीस अटक

Tuesday, 4th October 2022 06:51:56 AM

गडचिरोली,ता.४: निराधार बुजुर्ग आदिवासी महिलेवर एका ट्रक चालकाने ट्रकमध्येच बलात्कार केल्याची संतापजनक घटना २९ सप्टेंबर रोजी एटापल्ली तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतलाल जयराम कोठारी(३१) रा. बुरसातरुल, ता.गुरुकुंडल, जि.कांकेर, छत्तीसगड यास अटक केली आहे.

घटनेची हकीकत अशी की, पीडित महिला ही २९ सप्टेंबरला दुपारी एटापल्ली येथील बँकेतून निराधार योजनेची रक्कम काढण्याकरिता जात असताना एलचिल गावानजीकच्या कल्लेम फाट्याजवळ आरोपी संतलाल कोठारी याने एटापल्लीला पोहचवून देतो, असे सांगून ट्रकमध्ये बसविले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने कसेबसे अहेरी पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी संतलाल कोठारी याच्यावर भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला.

त्यानंतर एलचिल पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेज तपासल्यानंतर एका साक्षदाराच्या मदतीने गुन्ह्यासाठी वापरलेला ट्रक आणि ट्रकचालकाची ओळख पटविण्यात आली. पुढे बुरसातरुल येथे जाऊन पोलिसांनी आरोपी संतलाल कोठारी यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर काल (ता.३) त्याला अहेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक आरती नरोटे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मागील काही महिन्यांपासून सुरजागड पहाडावरुन दररोज शेकडो ट्रक लोहखनिज वाहून नेतात. यामुळे रस्ते खराब झाले असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे जनतेत तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आदिवासी महिलेवर बलात्काराची घटना घडली. यातील आरोपी हा लोहखनिज वाहून नेणाऱ्या ट्रकचा चालक तर नाही ना, या शंकेने नागरिकांमधून संतापाचे प्रतिध्वनी उमटू लागले आहेत.

 .


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SGO2M
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना