/* */
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022
लक्षवेधी :
  ३ कोटींच्या धान खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुरुमगाव येथील खरेदी केंद्रप्रमुखास अटक:             मेडीगड्डा धरणग्रस्तांनी आ.जयंत पाटलांना सांगितली व्यथा             शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पहिल्या दिवशी पाच महत्वाचे ठराव पारीत: आ.जयंत पाटील, आ.श्यामसुंदर शिंदे यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी उपस्थित             राज्यात सरकार आहे की नाही अशी स्थिती: शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांची गडचिरोलीत टीका           

आ.डॉ.देवराव होळी अपघातात थोडक्यात बचावले

Wednesday, 5th October 2022 08:14:58 AM

गडचिरोली,ता.५: आरमोरी येथील दुर्गादेवीच्या दर्शनाला जात असताना गाढवी नदीच्या पुलावर मोटारसायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात आ.डॉ.देवराव होळी यांच्या मोटारीला अपघात झाला. मात्र, आ.डॉ.होळी थोडक्यात बचावले असून, मोटारसायकलस्वार युवक जखमी झाला आहे. प्रलय सुधाकर मडावी(३०) रा.रायपूर, ता.चामोर्शी असे जखमी युवकाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

आरमोरी येथील दुर्गोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आज गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी हे गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास दशमुखे व अन्य सहकाऱ्यांसह दुर्गादेवीच्या दर्शनासाठी जात असताना गाढवी नदीच्या पुलावर एका मोटारसायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात आ.होळी यांच्या मोटारीने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. यात मोटारसायकलस्वार प्रलय मडावी हा युवक जखमी झाला. मात्र, आ.डॉ.होळी, वाहनचालक आणि काही सहकारी एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले. डॉ.होळी यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी युवकास आरमोरी येथील रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती कळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
F3YD4
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना