बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

रक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी

Thursday, 6th October 2022 06:15:35 AM

गडचिरोली,ता.६: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज काँग्रेसने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले.

काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेल व इतर विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हे शिबिर घेण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी स्वतः रक्तदान करत आपल्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी केली. 

याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विश्वजित कोवासे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष शामराव चापले,सुरेश भांडेकर, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवाणी, जितेंद्र मुनघाटे, रुपेश टिकले, प्रभाकर कुबडे, वसंत राऊत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम आदींनी उपस्थित राहून महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी वर्षभर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

या शिबिरात प्रणय भोयर, श्रीकृष्ण लोनबले, विजय मडावी, शुभम निसार, अभिजित हाजरा, समीर निसार,पराग जेंगठे, सनातन किर्तनिया, ढिवरू मेश्राम, सावन देवळे, अजय गहलोत, यश कुसाम, अनिल चव्हाण, अमित चुधरी, राकेश गेडाम यांच्यासह इतर रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
17UDG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना