/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.७: पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना आज दुपारी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत देलोडा (ता.आरमोरी) गावानजीकच्या जंगलात घडली. ठेमाजी माधव आत्राम(५०) रा.देशपूर, असे मृत इसमाचे नाव आहे.
ठेमाजी आत्राम हा आज सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह गुरे चारण्यासाठी देलोडा बीट क्रमांक १० मधील जंगलात गेला होता. दुपारी एक वाजताच्या सुमारास झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने ठेमाजीवर हल्ला करुन त्यास ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, शेतीची कामे करणे अवघड झाले आहे.