/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२६: कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेसाठी आज गडचिरोली जिल्ह्याचा संघ रवाना झाला.
२८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या संघात यज्ञ बोमनवार, मनिष वेलादी, नयन अडेटवर, पृथ्वी उगावकर, ऐश्वर्य दर्रो, पार्थ दिवसे, युवराज भेंडारे, नीरज पल्लो, सुमित धुडसे, नॉर्विन मेश्राम, शशांक राजगडे व आर्या साखलवार या खेळाडूंचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक साहिल राऊत व संघ व्यवस्थापक प्रशांत म्हशाखेत्री हेदेखील गेले आहेत.
गडचिरोली येथील प्रसिद्ध उद्योजक तथा अष्टभुजा केमिकल्सचे संचालक अतुल बोमनवार हे किटचे प्रायोजक आहेत. संघ रवाना होताना अतुल बोमनवार, अनिल तिडके, अतुल मल्लेलवार, बास्केटबॉल प्रशिक्षक अंकित ढोके व अश्विनी म्हस्के यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.