/* */
सोमवार, 29 मे 2023
लक्षवेधी :
  गण्यारपवार मारहाण प्रकरण: गावात येऊन बयाण घेण्याची साक्षदारांची मागणी             थेट बंगल्यावर जाऊन न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे निलंबित             चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे प्रथमवर्ग न्यायालयाचे आदेश             चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाट्यपुस्तकाचे २८ ला प्रकाशन              गडचिरोली जिल्ह्यातील तीन एसडीपीओंच्या बदल्या, पिपंरी चिंचवडचे सहआयुक्त प्रशांत अमृतकर गडचिरोलीचे नवे एसडीपीओ           

घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना अटक

Saturday, 5th November 2022 06:55:57 AM

गडचिरोली,ता.५: शहरातील विविध ठिकाणी घरफोडी करुन मूल्यवान दागिन्यांची चोरी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुलाम अहमद मेहमूद आलम शहा(३२), शाहिद अली हमीद अली शहा(१९), करीम बकसुला शहा(२०) व उसलम अजीमउल्ला शहा(१९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण उत्तरप्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील जिगणी येथील रहिवासी आहेत. सध्या ते आरमोरी येथे वास्तव्य करुन घरफोडी करीत होते. या चौघांनी १४ ऑक्टोबरला गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौकातील विनायक कुंभारे यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर ३ नोव्हेंबरला नेहरु वॉर्डातील प्रशांत सरकार यांच्या घरुन ४९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले होते.

तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चारही आरोपींना अटक करुन ३ महागडे मोबाईल, सोन्याचे ३ टॉप्स, चांदीची चाळ, ४ बेबी चाळ, ५ बेबी वारे, एक नथ, चांदीच्या ४ पायपट्ट्या, चांदीचे ५ जोडवे असा ऐवज जप्त केला. हवालदार विलास उराडे,पोलिस नाईक सचिन आडे, धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, ठोंबरे यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9X45A
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना