मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

धान कापणीकरिता गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Saturday, 12th November 2022 08:07:15 AM

गडचिरोली,ता.१२: धान कापणी करुन घरी परत येत असलेल्या महिलेवर हल्ला करुन वाघाने तिला ठार केल्याची घटना आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा टोली गावानजीक घडली. मंदा संतोष खाटे(३८) असे मृत महिलेचे नाव आहे.

मंदा खाटे यांच्या मालकीच्या शेतात आज धान कापण्याचे काम सुरु होते. त्याकरिता मजूर महिलांसह मंदा खाटे ह्यासुद्धा गेल्या होत्या. संध्याकाळी काम आटोपल्यानंतर इतर महिला घरी परत गेल्या. मात्र, मंदा खाटे शेतावर काम करीत राहिल्या. ५ वाजताच्या सुमारास घरी परत जात असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या ठार झाल्या.

माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अमिर्झा परिसरात यंदा वाघाने दोन ते तीन जणांना ठार केले आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले असून, शेतीची कामे करणे दुरापास्त झाले आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UVKS8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना