/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२१:भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक २६ व २७ नोव्हेंबरला गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली असून, पक्षाचे राज्यभरातील दीडशेहून अधिक नेते बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीनंतर जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली येथील बँक ऑफ इंडियासमोरील हॉटेल लेक व्ह्यू येथे होणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील, आमदार शामसुंदर शिंदे, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, पुरोगामी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष आशा शिंदे, पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख, माजी आमदार संपतबापू पवार, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड.राजेंद्र कोरडे, राहुल देशमुख, काकासाहेब शिंदे, प्रा. उमाकांत राठोड, चंद्रकांत चव्हाण, बाबासाहेब कारंडे, रामदास जराते, शर्मिला हांडे, चित्रलेखा पाटील, चित्रा गोळेगावकर यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हा चिटणीस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य सहभागी होणार आहेत.
या बैठकीत पक्ष संघटनेची बांधणी, सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर सत्यशोधकी विवेचन, तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांचे नियोजन आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरील जनसंघर्षाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मध्यवर्ती समितीच्या बैठकीनंतर २७ नोव्हेंबर रोजी गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी, निराधार, ओबीसी आदींच्या प्रश्नांवर पक्षाचे नेते जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत.
या निर्धार सभेला जिल्ह्यातील सर्व समुहांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस भाई संजय दुधबळे, महिला नेत्या जयश्री वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, सुधाकर आभारे,रमेश चौखुंडे, चंद्रकांत भोयर, अशोक किरंगे, दामोधर रोहनकर, गंगाधर बोमनवार, महागू पिपरे, किसन साखरे, तुकाराम गेडाम, बाजीराव आत्राम, सत्तू गावळे, देविदास मडावी, पुलखलच्या सरपंच सावित्री गेडाम, गुरवळाच्या सरपंच दर्शना भोपये, विलास अडेंगवार, प्रदीप आभारे, कविता ठाकरे, डंबाजी भोयर, रामकृष्ण धोटे, पांडुरंग गव्हारे, देवेंद्र भोयर, रेवनाथ मेश्राम, डॉ. भाऊराव चौधरी, भैयाजी कुनघाडकर, गजानन आभारे, अशोक ठाकूर, बाळू कुसराम, प्रदीप भाकरे, प्रभाकर पोरटे, देवराव शेंडे, मारोती आग्रे, तुळशीदास भैसारे, रवी कंकलवार, उत्तम भोयर, माणिक गावळे, हरिदास सिडाम, जीवन गेडाम, रामचंद्र साखरे, ईश्वर गेडाम,विलास मुनघाटे, नरेश कोहपरे, दामोधर चुधरी, मधुकर जल्लेवार, हिरामण तुलावी, भीमदेव मानकर आदींनी केले आहे.