/* */
शुक्रवार, 27 जानेवारी 2023
लक्षवेधी :
  झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत डॉ.परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर             गडचिरोली पोलिस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर           

३ कोटींच्या धान घोटाळ्याप्रकरणी खरेदी केंद्रप्रमुखास अटक

Saturday, 26th November 2022 07:41:57 AM

गडचिरोली,ता.२६: धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत ३ कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी धान खरेदी केंद्रप्रमुख गुरुदास धारणे यास अटक केली आहे.

आदिवासी विकास महामंडाळाच्या धानोरा येथील उपप्रादेशिक  कार्यालयांतर्गत मुरुमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे २०२०-२१ या खरीप हंगामाकरिता आधारभूत धान खरेदी योजेनेंतर्गत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. त्यानंतर खरेदीही सुरु करण्यात आली. परंतु तपासणीदरम्यान सुमारे ९८७८.९५ क्विंटल धान गोदामात शिल्लक नसल्याचे आढळून आले. या धानाची किंमत ३ कोटी २ लाख रुपये एवढी होती. याप्रकरणी संस्थेचे व्यवस्थापक एल.जी. धारणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी, प्रतवारीकार तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल कोकोडे  यांना सबंधित विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी समाधानकारक खुलासा न दिल्याने  उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी व विपणन निरीक्षक राहुल कोकोडे यांना निलंबित करण्यात आले होते.

पुढे तपासणीअधिकारी श्री.बावणेयांनी १८ ऑगस्ट २०२२ रोजी मुरुमगाव पोलिस मदत केंद्रात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी व्यवस्थापक  एल.जी.धारणे, केंद्रप्रमुख गुरुदेव धारणे, शंकर कुंभरे, राहुल कोकोडे, संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि अज्ञात व्यापारी यांच्या विरोधात ३१ ऑगस्ट २०२२ ला भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पोलिसांनी तब्बल ३ महिन्यांनंतर २५ नोव्हेंबरला खरेदी केंद्रपमुख गुरुदेव धारणे यास अटक केली. न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुरुमगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस अधिकारी जी.एस. आठवे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A44PT
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना