/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२८: कारमधून सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला मुलचेरा पोलिसांनी अटक केली आहे. प्राणकुमार गांधीराज सरकार(४०), असे आरोपीचे नाव असून, तो देशबंधूग्राम येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ९० हजारांचा तंबाखू आणि कार जप्त केली आहे.
आष्टीमार्गे मुलचेऱ्याकडे मारुती कारमधून सुगंधित तंबाखूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच मुलचेराचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी वनविभागाच्या नाक्यावर सापळा रचला. यावेळी कारची तपासणी केली असता तीत ८९ हजार ७०० रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी हा तंबाखू आणि ३ लाख २५ हजार रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख १४ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.