/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.३: एका प्रकरणात दाखल गुन्ह्यात संबंधित व्यक्तीस अटक न करण्यासाठी त्याच्याकडून साडेतीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या हवालदारास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली. शकील बाबू सय्यद(५०) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्त्याच्या आतेभावावर एका प्रकरणात गुन्हा दाखल आहे. परंतु त्याला अटक न करता जामीन मंजूर करण्यासाठी हवालदार शकील सय्यद याने तक्रारकर्त्यास ३ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी पोलिस ठाण्यात सापळा रचला. यावेळी तपास कक्षात तक्रारकर्त्याकडून ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार शकील सय्यद यास रंगेहाथ पकडण्यात आले.
एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, शिपाई राजू पद्मगिरीवार, श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, विद्या म्हशाखेत्री, तुळशीराम नवघरे आदींनी ही कारवाई केली.