गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कराराला उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मान्यता

Thursday, 29th December 2022 05:58:23 AM

गडचिरोली,ता.२९: येथील गोंडवाना विद्यापीठाने रशियाच्या किरोव येथील व्याटका स्टेट युनिव्हर्सिटीशी केलेल्या सामंजस्य कराराला राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता प्रदान केली आहे.

नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचे पत्र गोंडवाना विद्यापीठाला पाठविले आहे. हे पत्र कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाच्या नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ.मनिष उत्तरवार यांना सुपूर्द केले. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे उपस्थित होते. हा सामंजस्य करार समान देवाणघेवाण तत्वावर आधारित आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना रशियन भाषा शिकण्याची संधी गोंडवाना विद्यापीठामुळे उपलब्ध होणार आहे. सामंजस्य कराराच्या तरतुदींतर्गत पहिल्या उपक्रमाचा भाग म्हणून  प्राथमिक स्तरावर रशियन भाषेचा १०० तासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम जानेवारी २०२३ पासून सूरू होत आहे. व्याटका स्टेट विद्यापीठ रशियन भाषा शिकवेल. त्या बदल्यात गोंडवाना विद्यापीठ इंग्रजी भाषेतील समान अभ्यासक्रम त्यांना देईल, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठातर्फे देण्यात आली.

……………………


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U44N4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना