/* */
शुक्रवार, 27 जानेवारी 2023
लक्षवेधी :
  झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत डॉ.परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर             गडचिरोली पोलिस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर           

पोलिस व नक्षल्यांमध्ये तुंबळ चकमक

Monday, 16th January 2023 01:24:24 AM

गडचिरोली,ता.१६: अहेरी तालुक्यातील पेरमिली उपपोलिस ठाण्यांतर्गत वेडमपल्ली गावानजीकच्या जंगलात काल(ता.१५) विशेष अभियान पथकाच्या जवानांची नक्षल्यांशी चकमक उडाली. यात पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावत त्यांची काही शस्त्रे आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले.

रविवारी दुपारी अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगलात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या सुमारे २० ते २५ नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनीदेखील गोळीबार करून नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. यावेळी चकमकस्थळी १ पिस्तोल,१ भरमार बंदूक,१ वॉकीटॉकी, चार्जर व अन्य साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले.

सध्या नक्षल्यांचा भूमकाल सप्ताह सुरू आहे. यादरम्यान ते मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचा डाव उधळून लावण्यात आल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी पोलिसांचे कौतुक केले


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TALOC
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना